Posts

Showing posts from September, 2021

वर्ल्ड ट्री डे

Image
  आपले ग्रह हे हरित ग्रह आहे संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान ३३ टक्के जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. मानवाने प्रदूषणाला आळा घालणे आवश्यक आहे परंतु, हे काम अप्रत्यक्षपणे वृक्ष अतिशय प्रभावीपणे करू शकतात. या बाबतची जाणीव करून देऊन वृक्ष- संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. स्वत:ची गरज नव्हे, तर चैन पुरवण्यासाठी जंगलतोड करणा-या माणसांमुळे आता सर्वच जीवचक्रांचे आणि साखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. उदा. दर काही महिन्यांनी घरातील फर्निचर बदलणा-यांची हौस भागविण्यासाठी ब्राझीलसारख्या अनेक देशांतील अनेक मोठे वृक्ष तोडले जातात.हे थांबवण्याबरोबरच अधिक झाडे लावणेदेखील सर्वांच्याच जीवनासाठी आवश्यक आहे. याबाबतीत आपणच आपल्या पातळीवर योगदान द्यायला हवे.  त्यासाठी स्थानिक जातींच्या झाडांची लागवड करणे, एखादे तरी झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणे असे उपाय करता येतील. शिवाय अनेकदा समाजकंटकांकडून वृक्षतोड होत असते, तेव्हा राष्ट्रीय हरित लवाद, स्थानिक वृक्ष प्राधिकरण अशांसारख्या निमसरकारी विभागांना, सामाजिक संस्थांना किंवा वृत्तपत्रांना आपण थ...